अतुल सुभाष प्रमाणे आणखी एका पत्नीपीडित तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न! तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

0
2
अतुल सुभाष प्रमाणे आणखी एका पत्नीपीडित तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न! तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी


Uttar Padesh Crime : इंजिनीअर अतुल सुभाष यांच्याप्रमाणेच पत्नी आणि सासूला वैतागलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या पीडित तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या ठिकाणी त्याची मृत्यूशी लढाई सुरू आहे. मेरठच्या लिसरीगेट भागात ही घटना घडली. या प्रकरणी तरुणाच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पत्नी व सासूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



Source link