Monday, September 21, 2026
Homeसातारा...हा तर उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे भोसले यांची टीका | पुढारी

…हा तर उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे भोसले यांची टीका | पुढारी

[ad_1]








सातारा : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिश पणा असल्याची टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते असे बोलत असावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे.
आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. अशी वक्तव्य थांबवावी, आम्ही देखील उत्तर देऊ शकतो. परंतु, अशी आमची परंपरा नाही. त्यामुळे अशी वक्तव्य थांबवावी. तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. परंतु त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती.

त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारले. तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments