साताऱ्यात शॉक लागून तरुणाचा मृत्यू | पुढारी

0
15









सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राहूल बबन वायदंडे (वय 35, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, समर्थ चौकातून बोगदा परिसर जाणाऱ्या रस्त्यावर गॅरेज दुकान आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहूल वायदंडे हे पाणी मारत असताना अचानक त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. या घटनेने परिसर हादरला. गॅरेज मधील आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. जोराचा विजेचा धक्का बसल्याने वायदंडे जागीच कोसळले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती











Source link