
गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण चार जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यापैकी एक सुखरुप बचावला आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे. तर, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध सुरु आहे.




