पैशासाठी वारंवार त्रास देणाऱ्या दारूड्या मुलाला जन्मदात्यानेच संपवलं

0
20
पैशासाठी वारंवार त्रास देणाऱ्या दारूड्या मुलाला जन्मदात्यानेच संपवलं


मिळालेल्या सोलापूर-हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी विडी घरकूल वसाहतीत यासम कुटुंबीय राहतात. मृत श्रीनिवास याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. कामधंदा न करता दारू पिण्यासाठी तो दररोज वृध्द वडिलांना दमदाटी करून पैसे मागायचा. पैसे न दिल्यास चिडून वडिलांना मारायचा. दररोजच्या त्रासाला वडील मल्लय्या वैतागले होते. नेहमीप्रमाणे घरात श्रीनिवास याने वडिलांना दारूसाठी पैसे मागितले असता त्यांनी दिले नाहीत. तेव्हा श्रीनिवास त्यांच्या अंगावर गेला. तेव्हा चिडून वडील मल्लय्या यांनी स्वयंपाक घरातून चाकू आणला आणि मुलाला भोसकले. मानेवर, गळ्यावर, डोक्यावर, हाताच्या दंडावर अनेक वार झाल्याने श्रीनिवास गंभीर जखमी झाला.



Source link