कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार?

0
2


Devendra Fadnavis on Onion Price Crisis Maharashtra: राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही (Onion Price Crisis) निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावेत, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. तसेच विरोधकांनीही याच मुद्द्यावर बोट ठेवत सरकारव टीका केली आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. (Devendra Fadnavis on Onion Price Crisis)

Devendra Fadnavis on Onion Price: पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु

यावेळी बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांना विनंती केली आहे कि, आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, अनेक शेतकरी कांद्याला एक रुपये भाव मिळतो म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. म्हणून मी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगितलं, काही झालं तरी कांदा विकत घ्या, कांद्याचं शेल्फ लाईफ जास्त नाही. त्याची खरेदी, साठवणूक करुन तो पुन्हा बाजारात आणायचा, हे सगळं अडचणीचं असतं. पण आपल्या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे. हा कांद्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यानी दिली आहे. सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या आणि घरकुल लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमातही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी हि घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis : …..तरच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर जाईल

पुढे बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर फक्त भावांच्या भरवशावर राहून चालणार नाही. ती करायची असेल तर बहिणींना अर्थव्यवस्थेत आणावं लागेल. लाडक्या बहिणी उतरल्या तरच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर जाईल.

Radhakrishna Vikhe Patil : कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब, सरकार नक्कीच विचार करेल

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, यावर मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की आखाती देशात युद्ध असतांना देखील सरकारने कुठलीही निर्यात बंदी ठेवलेली नाही. मात्र जगाच संपूर्ण अर्थकारण एका हॉर्मोसवर थांबलेल आहे. आज मुंबई बंदरामध्ये किती शेतीमाल पडून आहे. आज कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब आहे, या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल. परंतु आज निर्यात बंदी नसताना ही आखाती देशात उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरें जावे लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

आणखी वाचा



Source link