
फलटण : जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने “दांडिया धमाल” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजी सायं. ५.०० वा. पासून रंगणार आहे.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रम ठेवण्यात आले असून, आकर्षक बक्षिसांची देखील सोय करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि उत्साही महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवार दि.३०/०९/२०१५ रोजी
वेळ-सायं. ५.०० वा.
स्थळ-अनंत मंगल कार्यालय, फलटण.








