ह्रदयद्रावक.. सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्ष 27 दिवसांनी निधन,अंत्यविधी अमेरिकेतच

0
2


सातारा : अमेरिकेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या भारताच्या लेकीचं प्राणज्योत अखेर आज मालवली. साताऱ्याच्या (Satara) कराड तालुक्यातील नीलम तानाजी शिंदे हिचा अमेरिकेत 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेतील Sacramento येथे सायंकाळी 7.30 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) (America) दुर्दैवी अपघात झाला होता. त्या अपघातानंतर तिला तात्काळ University of California Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून ती कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिच्यावर शक्य ते सर्व उपचार केले, परंतु प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. जवळपास गेल्या 13 महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे अखेर तिच्या शरीराने साथ दिली नाही आणि 28 मार्च 2026 रोजी उपचार सुरू असतानाच तिचे दु:खद निधन झाले.

आपल्या लेकीच्या निधनाचं डोंगराएवढं दु:ख असतानाही नीलमच्या कुटुंबीयांनी अत्यंत उदात्त निर्णय घेत, सामाजिक जाणीवा जपत अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली, ज्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. तिच्यावर आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) Mount Vernon Memorial Park येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नीलम अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने नीलमला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कवटीचे फ्रॅक्चर, तसेच हात आणि पाय फ्रॅक्चर झाले होते, तेव्हापासून ती कोमात होती. रुग्णालयात तिच्यावर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरू होते. मात्र, अखेर नियतीपुढे नीलमची झुंज अपयशी ठरली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या अंत्यसंस्कारालाही तिचे आई-वडिल हजर राहू शकले नाहीत. 

युद्धजन्य परिस्थितीमुळे आई-वडिलांनी भारतातून घेतलं अंत्यदर्शन (Satara girl neelam shinde)

दरम्यान, या अपघाताची माहिती भारतात असलेल्या नीलमचे वडील तानाजी शिंदे, मामा संजय कदम यांना मिळाल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अवघ्या काही तासात सरकारने दखल घेत यूएस वाणिज्य दूतावासाने त्यांना तातडीने व्हिसा दिला होता. मात्र, अखेर निलमची झुंज 1 वर्ष 27 दिवसांनी अपयशी ठरली. आज तिच्यावर अंत्यसंस्कार होत असताना आखाती देशातील युद्धामुळे वडील व कुटुंबीय उपस्थित राहू शकत नाहीत. तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या नीलमच्या आत्याकडून सर्व विधी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात

आणखी वाचा



Source link