
सैफच्या कामा विषयी
सैफ लवकरच ‘रेस ४’ या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच यापूर्वी त्याचे ‘आदिपुरुष’, ‘विक्रम वेदा’, ‘बंटी और बबली’, ‘भूत पोलीस’, ‘जवानी जानेमन’, ‘तान्हाजी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी तर सैफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता सैफच्या आगामी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.