सरकारने One nation one election धोरणाला मंजुरी देताच राजकीय वर्तुळातून विरोधाचा सूर, काँग्रेससह १५ पक्षांनी दंड थोपटले

0
17
सरकारने One nation one election धोरणाला मंजुरी देताच राजकीय वर्तुळातून विरोधाचा सूर, काँग्रेससह १५ पक्षांनी दंड थोपटले


माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वन नेशन वन इलेक्शनबाबत तयार केलेल्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विरोध तीव्र होताना दिसत आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटने हिरवा कंदील दाखवल्यानंतर काँग्रेससह १५ पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसने याला अव्यवहार्य आणि लोकशाहीशी विसंगत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही योजना जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली असून ही यशस्वी होणार नाही… जनता ती स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना खर्गे यांनी हे वक्तव्य केले.



Source link