
अजित पवार म्हणाले की, पक्षातील सर्व वरिष्ठ नेते देवगिरीवर जमलो होतो. पुढे काय करायचं यावर मंथन सुरू होते. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे १० ते १२ जण उपस्थित होते. शरद पवारांना थेट कसं सांगायचे म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावून घेतले. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तेव्हा तिने मला ७ ते १० दिवस द्या, मी साहेबांना समजावते असं म्हटलं. आम्ही दहा दिवस थांबलो. जयंत पाटील, अनिल देशमुखही होते. सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या मतदारसंघात विकास थांबलाय, कामांना स्थगिती दिली जात आहे. त्यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले आणि बघू असं म्हटलं.






