
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देवघरात चांदीच्या तीन मूर्त्या, सोन्याचे लहानमोठी ९ बिस्कीटे, चांदीची नाणी, रोख ८० हजार ठेवले होते. लक्ष्मीपूजन करून सर्वजण झोपले. पहाटे पाचच्या सुमारास फ्लॅटचे दार उघडे ठेवण्यात आले. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून देवघरातील जवळपास १० लाखांचा ऐवज लंपास केला. जाताना चोरटे मोबाईल फोनदेखील घेऊन गेले.






