Satara : सातारा जिल्ह्यातील कराडमधील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शेखर चरेगावकरला अखेर मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेखर चरेगावकर सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आहे. दीर्घ काळापासून फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता नव्हता. मात्र, मध्यरात्री आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विंग या गावातून चरेगावकरला ताब्यात घेतले आहे. चरेगावकर यांना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक झाली होती.
यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप
यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर 2025 मध्ये सुमारे 50 जणांविरोधात कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप, 50 जणांविरोधात गुन्हा दाखल
साताऱ्यातील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आले असून मुख्य आरोपी शेखर चरेगावकर याला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात आहे. सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांच्या जवळचा शेखर चरेगावकर आहे. गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता नव्हता, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कराड तालुक्यातील विंग गावातून ताब्यात घेतले असून कराड कोर्टाने दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप असून सुमारे 50 जणांविरोधात कराड पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसापुर्वी इडीची चरेगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून तपासणी केली होती. या कारवाईमुळे राज्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसापूर्वी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता
या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसापूर्वी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता. या बँकेच्या गैरव्यवहारावरून भाजपमधील पुण्यातील काही नेत्यांच्यात धुसफूस पाहायला मिळाली होती. यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जवळचे आहेत.
रिझर्व्ह बँकेने (RBI) यशवंत सहकारी बँक लिमिटेड, फलटण (जिल्हा सातारा) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35 अ सह वाचले जाणारे कलम 56 अंतर्गत लादलेल्या निर्देशांचा कालावधी वाढवला आहे. या निर्देशांनुसार, बँकेचे ठेवीदार पैसे काढण्याच्या मर्यादांमुळे (जसे की 10000 किंवा बँक-विशिष्ट मर्यादा) त्यांच्या संपूर्ण ठेवी काढू शकत नाहीत. बँकेने तिच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे हे पाऊल उचलले आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35 अ अंतर्गत, यशवंत सहकारी बँक लिमिटेड, फलटण यांना 28 मे 2025 रोजीच्या निर्देशांक क्रमांक CO.DOS.SED.No.S1580/12-22-321/2025-26 द्वारे 29 नोव्हेंबर 2025 रोजी व्यवसाय बंद होईपर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देश जारी केले, जे 24 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निर्देशांक DOR.MON.D-41/12.28.017/2025-26 द्वारे 28 फेब्रुवारी 2026 रोजी व्यवसाय बंद होईपर्यंत वाढवण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेला खात्री आहे की सार्वजनिक हितासाठी, 28 फेब्रुवारी 2026 रोजी व्यवसाय बंद होण्याच्या पलीकडे निर्देशांकाच्या कार्यकाळात आणखी वाढ करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 35अ च्या उप-कलम (1) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, भारत, याद्वारे 28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या व्यवसायाच्या समाप्तीपासून 28 मे 2026 रोजीच्या व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत निर्देशकाचा कालावधी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवत आहे, जो पुनरावलोकनाच्या अधीन आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने उपरोक्त मुदतवाढ आणि/किंवा सुधारणांचा अर्थ असा लावता कामा नये की भारतीय रिझर्व्ह बँक बँकेच्या आर्थिक स्थितीवर समाधानी आहे.
आणखी वाचा







