Shalinitai Patil Passes Away : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन (Shalinitai Patil passes away) झालं आहे. वृधापकाळाने त्यांच निधन झाल आहे. वयाच्या 94 व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्या माहिममधे राहत होत्या. राहत्या घरीच त्यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या
गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या. त्या मुंबईतील माहिन इथं राहत होत्या. तिथेच आज त्यांचं निध झालं आहे.त्यांच्यावर कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून दुख: व्यक्त केले जात आहे.
शालिनाताई पाटील कोण होत्या ?
शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि चर्चेचा राहिला आहे. वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1990 मध्ये जनता दलातून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते.
शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा.” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा








