भाजपला मिळाल्या ७०% राजकीय देणग्या; ‘या’ कॉर्पोरेट कंपन्यांनी दिल्या करोडो रुपयाच्या देणग्या

0
16
भाजपला मिळाल्या ७०% राजकीय देणग्या; ‘या’ कॉर्पोरेट कंपन्यांनी दिल्या करोडो रुपयाच्या देणग्या


भारतात विविध राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक देणग्या कोण देतो, असा प्रश्न सतत विचारला जात असतो. आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कोणत्या राजकीय पक्षाला किती कोटी रुपयाची देणगी मिळाली याचा तपशील जाहीर केला आहे. राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे या देणग्या मिळाल्या आहेत. हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, पुण्यातील अदार पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया या कंपन्या सर्वात मोठ्या राजकीय देणगीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 



Source link