
सध्या सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसत आहे. एखाद्यासोबत सायबर फ्रॉड झाल्यास तो बँकेची मदत घेतो, मात्र जर बँकेतूनच फसवणूक झाली असेल तर.. असाच प्रकार समोर आला आहे. बँक कर्मचाऱ्याने एका कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक आणि सायबर फसवणुकीच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी अॅक्सिस बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरसह तिघांना अटक केली आहे. बेंगळुरू येथील ड्रीमप्लग पेटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रिलेशनशिप मॅनेजरने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.






