पुणे तिथे काय उणे! राहुल गांधी, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी कोथरूडमध्येही केलं मतदान! कसं? वाचा…

0
21
पुणे तिथे काय उणे! राहुल गांधी, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी कोथरूडमध्येही केलं मतदान! कसं? वाचा…


Maharashtra Elections : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ बुधवारी चांगलाच चर्चेत आला होता. याचं कारण म्हणजे, इथे काही बड्या नेत्यांनी मतदान केल्याचे समोर आले आहे. आता या नेत्यांची नावं काही लहानसहान नाही बरं का… नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अमित शहा यांची नावं कोथरूडच्या मतदार यादीत दिसली आहेत. देशांतील इतक्या मोठ्या नेते मंडळींची नावं या यादीत दिसल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता. अनेक लोकांना यावर विश्वासच बसत नव्हता की, हे सगळ्या नेत्यांनी एकाच मतदारसंघात मतदान कसे केले?



Source link