
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम या भागात एका प्रवासी व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी व्हॅनवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.







