
पाकिस्तानी प्रियकराशी लग्न केलेली अंजू भारतात कायमची परतली आहे की पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार आहे, याबाबत काही माहिती मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी मीडियामध्ये नसरुल्लाहची एक मुलाखत समोर आली होती. त्याने या मुलाखतीतत्याने सांगितले होते की, तो स्वत: अंजूला वाघा बॉर्डर पर्यंत सोडायला येणार होता. अंजू भारतात आपल्या मुलांना भेटण्यासाठी जाणार आहे. अंजू मुलांना पाकिस्तानात यायंच असेल तर येऊ शकतात. मात्र त्यांना भारतात रहायचं असले तर ती त्यांची मर्जी असेल असं म्हटलं होतं. दरम्यान अंजू भारतात आल्याने तिचा पहिला पती चांगलाच भडकला आहे.







