
छोट्या पडद्यावरील अतिशय हिट मालिका म्हणून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ओळखली जात होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही कायम चर्चा रंगत असते. आता अशाच मैत्रिच्या नात्यावर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘पिंगा गं पोरी पिंगा’ असे आहे. या मालिकेत सर्व वयोगातील महिलांची मैत्री दाखवण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.