
दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. मागील वर्षी मैदानावरुन झालेल्या वादात न्यायालयाने हस्तक्षेप करून मैदान ठाकरे गटाला दिले होते. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं. आता त्यांनी आझाद मैदान निवडलं आहे.






