एन. रघुरामन यांचा कॉलम: स्मरणशक्तीच्या समस्या आपल्या युवा कार्यबलाला प्रभावित करत आहेत का?

0
3
एन. रघुरामन यांचा कॉलम:  स्मरणशक्तीच्या समस्या आपल्या युवा कार्यबलाला प्रभावित करत आहेत का?




20 वर्षांपासून एकाच कुटुंबासोबत काम करणाऱ्या 39 वर्षीय ड्रायव्हरला तीन कामे सोपवण्यात आली होती. मित्राच्या घरून पार्सल घेणे, किराणा सामानातील तीन वस्तू खरेदी करणे आणि परतताना लॉन्ड्रीतून कपडे घेऊन येणे. तो कपडे न घेताच परत आला. विचारल्यावर उत्तर दिले की, ‘विसरलो, माफ करा.’ एकदाच नाही, तर अनेक प्रसंगी त्याने अशा चुका केल्या व त्याचे उत्तरही तसेच असायचे. तो ते रस्तेही विसरू लागला होता, ज्यावरून तो वर्षातून किमान 5 वेळा तरी गेला होता. नवीन बांधकामांमुळे गोंधळ उडतो, असे त्याचे म्हणणे होते. दुसऱ्या प्रकरणात, दोन महिन्यांपासून एका मोहिमेवर काम करणारी, मध्यमवयीन तरुण अधिकारी, जागतिक प्रमुखासोबतच्या आढावा बैठकीत अचानक सुन्न झाली. त्यांच्यासोबतची तिची पहिलीच बैठक होती. तिला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची होती. पण एका कठीण प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी ती म्हणाली, ‘माफ करा, माझी स्मरणशक्ती काम करत नाहीये.’ वरील उदाहरणांमध्ये, अशा स्मरणशक्तीच्या समस्यांसाठी त्या दोघांचेही वय खूप कमी होते. दोघेही एकाच कंपनीत कार्यरत असल्याने व त्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा असल्याने डॉक्टरांनी तपासणी केली त्यांना असे आढळले की, वेगवेगळ्या स्तरावरील दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या आहे. एक अभ्यास सांगतो की, 2013-2023 दरम्यान 40 वर्षांखालील अमेरिकन प्रौढांमध्ये स्वतःहून नोंदवलेली बोधनात्मक अक्षमता जवळपास दुप्पट झाली. हे केवळ वृद्ध लोकांपर्यंत मर्यादित नाही. तणावामुळे मेंदूवरील धुकं (ब्रेन फॉग) व स्मरणशक्तीचा ऱ्हास वाढत आहे. कामाची मुदत पाळता न येणे, एकाग्रता कमी होणे, छोट्या चुका वाढणे यामुळे कामाच्या ठिकाणी परिणाम होत आहे. स्मरणशक्तीची कमतरता असलेले लोक कार्यबलात वाढत आहे. याची खालील कारणे आहेत: मानसिक थकवा आणि बोधनात्मक दबाव: जास्त तणावामुळे संप्रेरक वाढते, जे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि मानसिक थकवा जाणवतो. अतिकामामुळे मेंदूमध्ये संरचनात्मक बदल शक्य आहेत आणि किमान यामुळे मानसिक थकवा तरी येतोच. घटती उत्पादकता: स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे माहिती मेंदूत साठवणे कठीण होते. यामुळे कामगिरी कमकुवत होते. कर्मचारी सूचना लक्षात ठेऊ शकत नाहीत, बैठका विसरतात आणि कामाचा मागोवा घेऊ शकत नाहीत. युवकांवरही परिणाम: स्मरणशक्तीच्या समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही, तर 18-39 वयोगटातील प्रौढांमध्येही वाढत आहेत. विशेषतः कमी उत्पन्न आणि कमी शिक्षण असलेल्या लोकांमध्ये. विशिष्ट कारणे: या समस्यांच्या कारणांमध्ये झोपेची कमतरता, अस्वस्थता, नैराश्य, जीवनसत्व बी-12 ची कमतरता आणि काही प्रकरणांमध्ये कोविडचा समावेश आहे. मग आपण काय करावे? जीवनशैलीत बदलाचे काही सुचवलेले उपाय येथे दिले आहेत: 1. झोपेला प्राधान्य द्या: रोज रात्री 7-10 तासांच्या झोपेचे लक्ष्य ठेवा, त्याने स्मरणशक्ती मजबूत होईल व माहिती टिकून राहील. ‘रवंथ’ करा, जशी गाय खाल्लेले अन्न पुन्हा चघळते, तसेच झोपण्यापूर्वी दिवसातील महत्त्वाच्या घटना डोळे मिटून दहा मिनिटे आठवा. यामुळे सुप्त मनामध्ये माहिती दीर्घकाळ टिकून राहील. सजग राहा, ध्यान करा, दीर्घ श्वासाचे व्यायाम करा आणि पोषक आहार घ्या. हे स्मृतीभ्रंशाचा परिणाम कमी करण्यास उपयुक्त ठरते.
2. एकाच वेळी अनेक कामे करू नका, नियमित विश्रांती घ्या व प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा: एकाच वेळी अनेक कामे केल्याने मानसिक घर्षण वाढते. कामाचा दर्जा कमी होतो. हातातील काम पूर्ण करा. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याऐवजी कामे लिहून ठेवून मागोवा घ्या. दीर्घकाळ एकाग्र राहिल्याने मानसिक थकवा येतो, म्हणून विश्रांती घ्या. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी करण्यासाठी प्रत्यक्ष व डिजिटल कामाची जागा व्यवस्थित ठेवा. स्मरणशक्तीवर परिणाम करू शकणाऱ्या रक्तदाब, मधुमेह, थायरॉइडसारख्या आजारांबाबत दरवर्षी आरोग्य व्यवस्थापन ठेवा.
फंडा हा आहे की, मालकांना अधिक आश्वासक आणि मेंदूसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागेल, जेणेकरून अनुभवी आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांमधील बोधनात्मक घसरणीचा धोका कमी करता येईल. प्रत्येक कर्मचाऱ्याला अस्थिर करण्याऐवजी असे अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, जिथे कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करू शकेल.



Source link