
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्यासोबत सर्व बैठकांसाठी उपस्थित होते. त्यांनी माझ्याकडे मंत्रिपदाची मागणी केली होती. परंतु भाजपने अनिल देशमुख यांना मंत्रिपद देण्याची तयारी नव्हती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी आज केला. कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस -अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हा गौप्यस्फोट केला.






