
मनोरंजन विश्वात १९७०चं दशक गाजवणाऱ्या झीनत अमान आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘हरे रामा हरे कृष्णा’ सारख्या चित्रपटातून त्यांनी मनोरंजन विश्व गाजवलं आहे. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला. यानंतर, त्यांनी ‘डॉन’, ‘धर्मवीर’, ‘कुर्बानी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. आजही त्यांच्या अभिनयाची जादू मनोरंजन विश्वात पाहायला मिळते.







