
फलटण │ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून जनमानसात भक्कम विश्वास निर्माण केलेले युवा तडफदार नेतृत्व कुणाल किशोर काकडे यांनी प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
स्थानिक पातळीवर युवकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या भक्कम पाठपुराव्यामुळे कुणाल काकडे हे विकासाभिमुख व तळमळीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा वाढता जनाधार लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अर्ज दाखल करताना काकडे यांनी “प्रभाग क्रमांक २ च्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकसहभागातून काम करणार” असा विश्वास व्यक्त केला.








