
यामीने जून २०२१मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी गुपचूप लग्न केले. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा आर्टीकल ३७० लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ओएमजी 2, ‘भूत पोलीस’, ‘चोर निकल के भागा’, ‘लॉस्ट’, ‘दसवी, ‘ए थर्सडे’ या चित्रपटात तिने काम केले होते.








