Thursday, August 27, 2026
Homeसाताराअनंत मंगल कार्यालय कोळकी येथे कार्यकर्ता मेळावा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे कार्यकर्ता मेळावा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण : दि २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता . अनंत मंगल कार्यालय , कोळकी येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी होवू घातलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे .

माढा लोकसभा मतदारसंघातून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता . भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरयांनाच तिकिट मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती .

तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही काही महिन्यापूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही , तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही , असा निर्धार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त बोलून दाखवला होता .

परंतु माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच लोकसभेची उमदेवारी जाहीर केल्याने . आगामी लोकसभा निवडणुकी मध्ये श्रीमंत रामराजे यांचा गट काही वेगळी भूमिका घेणार का? अशी ही चर्चा सध्या फलटण तालुक्यात सुरु आहे

गत दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सागर” निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची बैठक संपन्न झाली होती. सदरील बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे यांनी महायुतीचे काम करावे; असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. त्यावर श्रीमंत रामराजे यांनी मतदार संघामध्ये जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना व मते जाणून घेणार असल्याबाबतची माहिती सोशल मीडिया द्वारे दिली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments