Wednesday, August 26, 2026
Homeसाताराप्रज्ञावंत शिक्षक श्री. भिमराव लोंढे यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रज्ञावंत शिक्षक श्री. भिमराव लोंढे यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित


फलटणः मोहोळ येथे झालेल्या विशेष समारंभात झेड.पी. शाळा वडले, फलटण येथील आदर्श , विद्यार्थी प्रिय, उपशिक्षक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, मा.श्री. भिमराव हरिबा लोंढे यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे ‘राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
श्री. लोंढे हे एक आदर्श शिक्षक असून, त्यांचे व्यक्तिमत्व बहुमुखी आहे. ते केवळ अध्यापनातच नव्हे तर लेखन, गायन, वादन, चित्रकला आणि खेळ यांमध्येही प्रवीण आहेत. ‘एक होता आत्मविश्वास’ आणि ‘एक सच्चा दोस्त संत गाडगे बाबा’ या त्यांच्या ग्रंथांनी समाजात जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानामुळे आणि नवकल्पनांच्या प्रयोगशीलतेमुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. लोंढे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी साहस टाईम्स तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments