
Vande Bharat Express Meal News: अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या आणखी एका घटनेत वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या डाळीत जिवंत झुरळ आढळून आले. अन्नात कीटक आढळून आल्यानंतर प्रवाशाने तत्काळ रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. प्रवाशाने नाराजी व्यक्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. क्लिपसोबत जेवणाचा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.





