
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये देसी जुगाड दाखवणारे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सोशल मीडियावर सध्या लहान बाळाचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एका आईने बाळाला झोपवण्यासाठी युनिक टेक्निक वापरली आहे, ज्यामुळे बाळ अवघ्या १० सेकंदात झोपी गेले.







