
अंजली अरोराच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहतीने लिहिले की, ‘अंजली, तुझा हा ड्रेस खूप सुंदर आहे.कधीतरी मलाही दे’. तर, एका चाहत्याने म्हटलेय की, ‘मला माहित नाही की, मी हा व्हिडीओ किती वेळा पाहिला आहे… तरीही प्रत्येक वेळी तुम्ही अगदी नवीन आणि वेगळ्या दिसत आहात.’ आणखी एकाने लिहिले की, ‘तुम्ही खूप छान दिसत आहात.’ तर एका चाहत्याने तिची स्तुती करताना लिहिले की, ‘तुम्हाला देवाने खूप वेळ घेऊन बनवले असेल.’ अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.








