Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशViral News : रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले...

Viral News : रील बनवण्याच्या नादात घेतला गळफास! तडफडू लागल्यावर मित्र म्हणाले ‘नाटक’; अल्पवयीन मुलाचा करुण मृत्यू

[ad_1]

रील तयार करण्यासाठी एका मुलाने गळ्यात दोरीचा फास घातला. मात्र, हा फास गळ्याभोवती आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी हा गळ्यात फास लावून रील बनवत होता. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अंबा येथे घडली. करण परमार (वय ११) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. करण हा लेन रोडवरील मोकळ्या जागेवर इतर मुलांसोबत खेळत होता. दरम्यान, रील काढण्यासाठी त्याने गळफास घेतला. मात्र, गळ्याभोवती फास आवळल्याने तो तडफडू लागला. यावेळी त्याचे मित्रही तेथे होते. त्याला त्यांनी तडफडतांना पाहिले. मात्र, तो नाटक करत असल्याचे सर्वांना वाटले. आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. जीव गुदमारल्याने काही वेळातच करण बेशुद्ध झाला. हे पाहून मुले त्याच्याजवळ पोहोचली. तो हलत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुले पळून गेली. ज्या मुलाने व्हिडिओ बनवला तोही त्याचा मोबाईल तिथेच टाकून पळून गेला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments