
रविया असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलीचे नाव असून ती लुधियाना येथील रहिवाशी आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रविया त्यांच्या कुटुंबांसोबत पाटियाला येथे गेली होती, जिथे तिने एका दुकानातून चॉकलेट खरेदी केली. घरी परतल्याने तिने चॉकलेट खाल्ले. मात्र, काही वेळाने तिला उलटीचा त्रास होऊ लागला.








