
अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर १९७१मध्ये त्यांनी गीतांजली यांच्याशी लग्न केले. विनोद खन्ना प्रत्येक बाबतीत यशस्वी ठरले होते. त्यांच्याकडे संपत्ती, प्रसिद्धी, कुटुंब, सर्व काही होते. पण, या सगळ्यातही त्यांना रितेपणा जाणवत होता. स्वतःला जाणून घेण्यासाठी ते अस्वस्थ झाले होते. त्याचवेळी त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते.








