
तांबट हा अमिरिकेच्या फ्लाइटने मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला पकडून ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबट हा खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. गुंड रवी पुजारीने २०१७ मध्ये रोमा बिल्डर्सच्या महेंद्र पमनानी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, ज्यात तांबट यांचाही समावेश होता.








