
करण आणि द्रिशाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. या दरम्यान नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये धर्मेंद्र यांच्या घराची सजावट करण्यात आलेली दिसत होती. आता करण देओलच्या संगीत सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले आहेत. यामध्ये देओल कुटुंबातील लोकही दिसत आहेत. प्रत्येकजण खूप आनंदी आहे. सनी देओलच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहे. तर, या निमित्ताने देओल कुटुंब बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसले आहे.








