श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणमध्ये विविध उपक्रमांची

0
76
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणमध्ये विविध उपक्रमांची

फलटण, विद्यानगर येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर (आदरणीय बाबा) यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले.

या दिवशी “वही तुला”, खो-खो मैदान पूजन, वृक्षारोपण, बक्षीस वितरण, लकी ड्रॉ, तसेच महिलांसाठी फनी गेम्स अशा उपक्रमांमुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी गरजू विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मा. श्री. भोजराज नाईक निंबाळकर (सदस्य, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी), तर प्रमुख उपस्थितीत मा. सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, मा. सौ. नुतन शिंदे, मा. श्री. नितीन गांधी, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. शिरीष भोसले, श्री. रणजित निंबाळकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी केले. “शुभेच्छांची आमराई” या संकल्पनेतून शिक्षकांनी बाबांसाठी विशेष शुभेच्छापत्रांची निर्मिती केली होती, जी विशेष आकर्षण ठरली.

आदरणीय बाबांनी आपल्या मनोगतात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी पालकांच्या विश्‍वासाबद्दल आभार मानत शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

अध्यक्षीय मनोगतात मा. भोजराज नाईक निंबाळकर यांनी “एकसष्टीसारख्याच शताब्दी सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊ” अशा भावना व्यक्त केल्या. वही दान उपक्रमात पालक, शिक्षक आणि शाळा समितीचा सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमाचे सुंदर संचालन सौ. रूपाली कदम यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. माधुरी काशीद यांनी केले. पालक प्रतिनिधी आशा घाडगे व शिक्षक प्रतिनिधी श्री. चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त करत आदरणीय बाबांना शुभेच्छा दिल्या.