varandha ghat : वरंधा घाट अखेर खुला! २५ ऑगस्ट पासून सर्व वाहनांना करता येणार प्रवास

0
14
varandha ghat : वरंधा घाट अखेर खुला! २५ ऑगस्ट पासून सर्व वाहनांना करता येणार प्रवास


पुणे : पुण्यातून कोकणात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेला वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता. या वर्षी देखील पावसामुळे हा घाट बंद होता. मात्र, हा घाट लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर नागरिकांच्या मागणीला यश आले असून येत्या २५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा घाट खुला करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.



Source link