
अभिनेता वैभव तत्ववादी हा अमरावतीचा आहे. त्याचा जन्म अमरावतीत झाला. वैभवने नागपूरमधील सोमलवार हायस्कूलमधून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्याने पुणे येथे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेटालर्जिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. वैभवला शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने शाळेत असल्यापासूनच नाटकांमधून काम करायला सुरुवात केली होती. मात्र, तू आधी स्वतःचं शिक्षण पूर्ण कर आणि नंतरच मनोरंजन विश्वात जाण्याचा विचार कर, अशी तंबी त्याच्या वडिलांनी दिली होती. तर, अभिनयासोबतच बॅकअप प्लॅन असावा म्हणून वैभवने इंजिनिअर बनण्याचा निर्णय घेतला.







