Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशUS On Mooon | अमेरिकेनं 50 वर्षांनतर पुन्हा चंद्रावर ठेवलं पाऊल! ओडिसियस...

US On Mooon | अमेरिकेनं 50 वर्षांनतर पुन्हा चंद्रावर ठेवलं पाऊल! ओडिसियस या पहिल्या खासगी अंतराळ यानाची चंद्रावर यशस्वी लँडिंग | Navarashtra (नवराष्ट्र)

US On Mooon | अमेरिकेनं 50 वर्षांनतर पुन्हा चंद्रावर ठेवलं पाऊल! ओडिसियस या पहिल्या खासगी अंतराळ यानाची चंद्रावर यशस्वी लँडिंग | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लँडिंगच्या काही वेळापूर्वी, Intuitive Machines च्या Odysseus लँडरच्या नेव्हिगेशन सेन्सरमध्ये बिघाड झाला होता. हे यान एका खाजगी कंपनीने बनवले होते, पण चंद्रावर पोहोचण्यासाठी सर्व निधी नासाने केला होता.

चंद्रावर पोहोचणारा दुसरा देश अशी ओळख असणाऱ्या बलाढ्य अमेरिकेत नेहमीच अंतराळाशी संबधित प्रयोग होत असतात. आता अमेरिकेनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 1972 मध्ये अमेरिकेनं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. आता तब्बल 50 वर्षांनंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ओडिसियस नावाचं अवकाशयान लँडर ( Odysseus Lander) यशस्वीपणं उतरवलं. ओडिसियस लँडर हा सहा पायांचा रोबोटिक लँडर आहे. दक्षिण ध्रुवाचं विवर ज्यामध्ये ओडिसियस लँडर उतरलं होते ते मलापर्ट ए म्हणून ओळखलं जातं. हा चंद्राचा तो भाग आहे जिथं भारतानं चांद्रयान 3 चं विक्रम लँडर उतरवलं होतं.

हे सुद्धा वाचा

1972 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं आपलं अंतराळ यान चंद्रावर उतरवण्यात यश मिळविलंय. हे अंतराळ यान एका खासगी कंपनीनं बनवले होतं, परंतु चंद्रावर पोहोचण्यासाठी सर्व निधी नासानं केला होता. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ओडिसियस लँडरच्या लँडिंगवर सांगितले की, आज अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच अमेरिका चंद्रावर पोहोचेल. आज, मानवी इतिहासात प्रथमच, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक खासगी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलंय.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments