Friday, August 21, 2026
HomeमनोरंजनUPSC: Questions on linguistic literature मुलाखतीच्या मुलखात : भाषिक साहित्यावरील प्रश्न

UPSC: Questions on linguistic literature मुलाखतीच्या मुलखात : भाषिक साहित्यावरील प्रश्न

UPSC: Questions on linguistic literature मुलाखतीच्या मुलखात : भाषिक साहित्यावरील प्रश्न

[ad_1]

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२५ ची अधिसूचना पाहिली तर लक्षात येते की मुख्य परीक्षेसाठी घेता येणाऱ्या वैकल्पिक विषयांची संख्या २६ आहे. यात पूर्वी लिहिल्याप्रमाणे अनेक विषयांचा समावेश आहे. उदाहरणार्थ जिऑलॉजी, बॉटनी, लॉ, तत्वज्ञान (फिलॉसॉफी). या यादीत २६ व्या क्रमांकावर आहे, पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य. या यादीत असामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराथी, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, उर्दू आणि इंग्रजी अशा २३ भाषांचा समावेश आहे. म्हणजे या २३ पैकी कोणत्याही भाषेचे साहित्य हा वैकल्पिक विषय म्हणून उमेदवार घेऊ शकतात.

संघ लोकसेवा आयोगाने हे एवढे व्यापक पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून दिले आहेत. यातून या परीक्षेतून निवड होणारे उमेदवार कसे विविध प्रकारच्या राज्यातून, विविध विषयांचा अभ्यास करून आलेले असतात हे लक्षात येईल. पूर्वी नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत दोन वैकल्पिक असायचे. त्यावेळी साहित्य विषय घेणाऱ्या उमेदवारांची सांख्य खूप मोठी होती. आता काही वर्षांपासून एकच वैकल्पिक विषय मुख्य परीक्षेसाठी असतो त्यामुळे साहित्य विषय घेणाऱ्या उमेदवारांची संख्या बरीच कमी झाली आहे.

आपण वरच्या यादीत पाहिलंच आहे की २३ भाषांमधल्या साहित्याचा वैकल्पिक विषय म्हणून समावेश आहे. प्रत्येक भाषेच्या साहित्यात काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याबद्दल उमेदवाराला माहिती असणं आवश्यक असतं. पण काही सर्वसाधारण स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, हे विषय कोणत्याही भाषेच्या साहित्यासंदर्भात विचारले जाऊ शकतात. साहित्य या विषयाच्या अभ्यासाचा तुम्हाला प्रशासनात काय उपयोग आहे? तुम्ही जे साहित्य वाचलं आहे त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला रोजच्या कामात उपयोगात आणता येईल असं तुम्हाला वाटतं ? साहित्याला समाजाचा आरसा का म्हणतात? साहित्य, समाज आणि कलाकृती यांचा अनुबंध कसा असतो? साहित्य हा वैकल्पिक विषय म्हणून का निवडला अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच उत्तर व्यवस्थित तयार करून ठेवावं.

हे सदर मराठी भाषेमधून असल्यामुळे आजच्या लेखात आपण मराठी वाङ्मय हा वैकल्पिक विषय घेणाऱ्या उमेदवारांना मराठी बद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया. १९९० साली भूषण गगराणी (आयएएस, सध्या मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त) यांनी मराठी साहित्य आणि इतिहास हे दोन ऐच्छिक विषय घेत भारतात तिसरा क्रमांक पटकावला आणि मराठी साहित्य हा ऐच्छिक विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १९९० ते २००० या दशकात एकदम वाढली. कालांतराने ती संख्या कमी झालेली दिसत आहे. पण मराठी साहित्य ऐच्छिक विषय असणाऱ्या उमेदवारास मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातात याविषयीची माहिती आम्ही या सदरातून आपणास देत आहोत.

कोणत्या मराठी साहित्यकाराला / साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? कोणत्या साहित्यकाराला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला? मराठी भाषेच्या उगमाचे स्राोत कोण कोणते आहेत? प्राचीन, मध्ययुगीन वा अर्वाचीन तुम्हाला मराठी साहित्यातला कुठचा साहित्य प्रकार आवडतो? मराठी साहित्यातले मुख्य प्रवाह किंवा प्रकार कोणते? एकूण मराठी साहित्यविश्वात दलित वाङ्मयाचे स्थान काय आहे? दलित साहित्य हे विद्रोही साहित्य आहे का? इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा मराठीत दलित साहित्य मोठ्या प्रमाणावर का लिहिले गेले असे तुम्हाला वाटते? नामदेव ढसाळ यांचे मराठी साहित्यात योगदान काय आहे? विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकाविषयी तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात नाट्य परंपरा खूप मोठी आहे, मराठीतले महत्त्वाचे नाटककार कोण आहेत? संत वाङ्मयाचे एकूण मराठी साहित्यात काय योगदान आहे असे तुम्हाला वाटते? तुमचे आवडते साहित्यिक कोण? त्यांच्या लेखनाबद्दलची कुठची गोष्ट तुम्हाला भावते? मराठीतल्या काही महत्वाच्या साहित्य कृतींचे इंग्रजी अनुवाद झाले आहेत का? मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याचा नेमका काय फायदा होईल? मुलांना प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे की इंग्रजी? बोली भाषा आणि प्रमाण भाषा यात काय फरक आहे? मराठी भाषेच्या भवितव्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?

मराठी वाङ्मय या विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला असेल त्या सर्वच मुलाखतीसाठी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या मराठी साहित्यिकाला एखादा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला असेल तर त्याबद्दलही माहिती उमेदवाराला असली पाहिजे. साहित्य, कला, संस्कृती या सर्वांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे त्यामुळे अशा प्रकारचे परस्पर संबंधित प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातले काही साहित्यिक हे राष्ट्रीय स्तरावर माहिती आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल चांगली माहिती असलीच पाहिजे.

हे काही उदाहरणादाखल मराठी साहित्यावरचे प्रश्न दिले आहेत. इतर भाषांच्या साहित्या बद्दल त्या त्या साहित्यानुसार प्रश्न विचारले जाऊ शकतात.

mmbips@gmail.com

supsdk@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments