
अश्विनीने ‘मिसेस इंडिया’ ही स्पर्धा जिंकू नये, यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले होते. नात्याने शिल्पी ही अश्विनीची भावजय आणि नणंद दोन्ही आहे. मात्र, अश्विनीने कधीच आपल्या पुढे जाऊ नये, असे तिला वाटते. त्यामुळे ती शक्य ते सगळे प्रयत्न करून अश्विनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तिने या कटात पती विद्युतचा मित्र विक्रम याची मदत घेतली होती. यासाठी शिल्पीने आपल्या पतीची साथ सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान तिने विद्युतचं घर सोडताना सोबत स्वतःच्या मुलाला अर्थात संजूला देखील सोबत विक्रमकडे नेलं.








