Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशTrending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल...

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

[ad_1]

जर्मनीचा TikTok स्टार नोएल रॉबिन्सन (Noel Robinson) नुकताच मुंबईत येऊन गेला. त्याने नुकताच एका गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई पोलीस दलात डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस क़ॉन्स्टेबल अमोल कांबळे याच्यासोबत डान्स करतानाचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नोएल रॉबिन्सन लिहितो, ‘हॅलो इंडिया… अखेर मी इथे आलोय.’ नोएल रॉबिन्सनचं मुंबई ८ मे रोजी आगमन झालं. तेव्हापासून तो भारताच्या आर्थिक राजधानीत जवळजवळ सगळीकडेच डान्स करत फिरतोय. या शहरातील अनेक अनोळखी लोकांसोबत तो डान्स करतोय. कधी मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना, कधी रस्त्यावर तर कधी बाजारात तो डान्स करतोय. असाच डान्स करता करता तो मुंबई पोलीस दलात ‘डान्सर’ म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कांबळे यांच्यापर्यंत तो पोहोचला. आणि मग काय विचारता. दोेघांनाही डान्सचं वेड. त्यामुळे अमोल कांबळे यांनी TikTok स्टार नोएल रॉबिन्सनसोबत दोनदा डान्स केले. त्यापैकी एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments