
न्यूज एजन्सी एएनआयने रेल्वे अपघाताचे काही फोटो जारी केले आहेत. त्यामध्ये दिसते की, घटनास्थळी लोकांची गर्दी झाली आहे. काही डबे रुळावरून घसरले आहेत. दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत प्रशासनाला मदत व बचाव कार्याबाबत सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी आवश्यक रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी.








