दौंड, जि. पुणे | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या वाटेत अंधार धावून आला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे सोमवारी पहाटे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेत, दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी कुटुंबाला अडवून लुटले आणि त्याचवेळी वाहनात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब चारचाकी वाहनाने पंढरपूर वारीसाठी निघाले होते. वाटेत स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबले असताना, पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चहा घेऊन पुन्हा वाहनात बसताच दोन दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत, “जिवंत राहायचं असेल तर काहीही विरोध करू नका,” अशी धमकी दिली. यावेळी महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेण्यात आले.
लुटीनंतर, त्यापैकी एकाने वाहनात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीला खेचून काही अंतरावर झुडपात नेले