
जेनिफर मिस्त्रीने एकदा तिच्या युट्युब व्लॉगवर कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. तिचा हाच जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वतःची आपबिती सांगताना दिसत आहे. जेनिफर म्हणते की, ‘तुम्ही विवाहित आहात हे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. तुम्ही सगळ्यांना सांगत राहिलात की, तुमचं लग्न झालंय, तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. तुम्ही दुसरे काही करू नका, मी तुम्हाला एक संधी देतो. थोडं थोडं निर्मात्यासोबत फिरावं लागेल… मला हे सगळं सांगितलं जात होतं’.








