हातकणंगले : यंदाच्या होऊ घातलेल्या लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवारांच्या अनुषंगाने सर्वत्र इतर चर्चा – अफवा पसरविल्या जात असताना. हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदा वेगळी तिहेरी रणधुमाळी असेल असे चित्र दिसत आहे, मात्र तिथल्या शेतकरी – कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा कल हा स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या राजू शेट्टी यांच्या बाजूने दिसतो आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे २०१९ साली निवडून आलेले खासदार धैर्यशील माने यांनी यंदा ही महायुतीतून आपला उमेदवारी अर्ज भरला जात असताना, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील – सरुडकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पण या सगळ्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोंधळात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी, स्वाभिमानाने एकट्यानेच लढण्याचा विचार केला होता आणि ते त्या पद्धतीनेच प्रचार करताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांच्या बाजूने असणारा लोकांचा कौल पाहता लक्षात येते की, यंदाची हातकणंगलेची जागा इथली जनता ‘ एक बंदा काफी है ‘ या विचाराने आपले मत राजू शेट्टी यांच्या पारड्यात टाकेल असे निरिक्षण जाणकार नोंदवत आहेत. आणि हेच हातकणंगले लोकसभा मतदार संघातील बदलाचे चिन्ह दिसत आहे.
पण यंदाची हातकणंगले लोकसभा निवडणूक गाजणार हे मात्र नक्की. आणि महायुती व महाविकास आघाडीच्या गोंधळात, राजू शेट्टी आपली स्वाभिमानी भूमिका अजून गडद करत, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत दिल्ली गाठणार का? हे पाहणे औचित्याचे ठरेल.