जनतेच्या मनातून उमटलेला आवाज – “आपल्या हक्काची उमेदवार” म्हणून रेहाना बशीर मोमीन प्रभाग क्र. 10 मधून रिंगणात!

0
50
जनतेच्या मनातून उमटलेला आवाज – “आपल्या हक्काची उमेदवार” म्हणून रेहाना बशीर मोमीन प्रभाग क्र. 10 मधून रिंगणात!

फलटण प्रतिनिधी :- फलटण शहराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिले असून, त्या परंपरेचा वारसा आजही इथल्या जनतेत दिसून येतो. या सामाजिक व ऐतिहासिक वारशाला पुढे नेत, समाजकारणाला प्राधान्य देत मोमीन कुटुंबीयांनी नेहमीच जनतेच्या सुखदुःखात एक पाऊल पुढे येऊन सेवा बजावली आहे.

युवानेते बबलू शेठ मोमीन यांनी फलटण शहरात समाजकारणाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय बांधिलकी जोपासली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, होणाऱ्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत श्रीमती रेहाना बशीर मोमीन यांना प्रभाग क्र. 10 मधून प्रतिनिधित्व करावे, असा जनतेकडून प्रबळ आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.

मोमीन कुटुंबीयांनी तीन पिढ्यांपासून जनतेची सेवा केली आहे. सामाजिक वारसा म्हणजे केवळ परंपरा आणि संस्कृती नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाचा विकास घडविण्याचा एक वसा असतो. हा वारसा पुढे नेत, रेहाना मोमीन समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.

त्यांच्या उमेदवारीमागे माढा लोकसभेचे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन आहे.

जनतेचा विश्वास, समाजाचा पाठिंबा आणि विकासाचा संकल्प — या त्रिसूत्रीवर आधारलेली ही उमेदवारी प्रभाग क्र. 10 साठी विकासाचा रोडमॅप ठरणार असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

जनतेच्या मनातून आलेली ही उमेदवारी नक्कीच जनतेच्याच विजयात परिवर्तित होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.