
सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.






