Sunday, August 30, 2026
Homeसाताराप्रबुद्ध विद्याभवन चा पहिला शिक्षक सेवानिवृत्त झाला;  जयश्री होणराव

प्रबुद्ध विद्याभवन चा पहिला शिक्षक सेवानिवृत्त झाला;  जयश्री होणराव

फलटण : कोणालाही हुंदका आवरता आ ला नाही.प्रबुद्ध विद्याभवन चा पहिला शिक्षक सेवानिवृत्त झाला. जयश्री होणराव; यांचा काल निरोप समारंभ झाला.
२४ वर्षाच्या ज्ञान दानच्या काळातील त्यांचे विविध पैलू उपस्थित शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने मांडले. बहुतांश स्तुती सुमने असली तरी भावना व्यक्त करताना प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता, कोणालाही अश्रु रोकता आले नाहीत. सर्व विद्यार्थी तर हंभरठा फोडून रडत होते.
नटूनथटून आलेले आनंदी वाटणारा निरोप समारंभ कधी गंभीर होऊन शोकाकुल झाला ते कळलेच नाही.
मी तरी असा कार्यक्रम कधी पाहिला नव्हता. शिक्षकाबद्दल एवढा आपलेपणा, प्रेम हीच जयश्री होणरावांच्या २४ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाची पोहच पावती होती. यासारख्या मोठा सत्कार शिक्षकासाठी असुच शकत नाही.
अश्रूंचा प्रेमवर्षाव पाहून जयश्री होणराव यांना समारोपाचे विचार मांडताना खूप गहिवरून आले. प्रत्येक वाक्य सांगता त्यांच्या डोळ्यातील अश्रू थाबत नव्हते. या प्रसंगाने तर सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. विद्यार्थी तर मोठमोठ्याने रडू लागले. बाईंचे बोलणे संपत नाही तोच मुलांनी त्यांना गराडा घालून रडू लागले. शाळा सोडून जाऊ नका अशी केविलवाणी विणवणी करु लागले. नक्कीच हे द्रुष्य कल्पने पलीकडील मन हेलावणारे होते.
निरोप प्रसंगी होनराव बाईंनी वडीलांच्या स्मरणार्थ शाळेला १० बेंच भेट दिले.
प्रबुद्धच्या शिक्षकातील तळमळीने ज्ञानदान करणार्या शिक्षकाला निरोप प्रसंगी सत्कार करताना प्रबुद्ध चा कुटुंब प्रमुख म्हणून मला खूप वाईट वाटलेप्रबुद्ध चा एक शिक्षक सेवानिवृत्त झाला. यावेळी लक्षात आले. प्रबुद्ध विद्याभवन आता प्रौढ झाली आहे.प्रबुद्ध ने ३० वर्षाचा यशस्वी टप्पा पुर्ण केला आहे.

दत्ता अहिवळे
प्रबुद्ध कुटुंब प्रमुख
३० जून २०२४

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments